Vivek Vichar - विवेक विचार - April 2017

Publisher: Vivekananda Kendra
Category: Religious & Spiritual, Journals
Language: Marathi
Frequency : Monthly
DurationAmountSavings
Single issue $ 0.99 -
6 Months $ 1.99
Save 67%
Save 67%
1 Year $ 1.99
Save 84%

Just $0.17 per issue
Save 84%

Subscribe to Magzter GOLD and enjoy Unlimited reading of Vivek Vichar - विवेक विचार Magazine (including old issues) along with 5,000+ other best-selling magazines and premium articles for just $9.99/Month!


संपादकीय । विवेक विचार । एप्रिल २०१७ मागील 1200 वर्षांपासून भारतीय मनाला छळणारा एक प्रश्‍न आजही कायम आहे. 1947 ला तेव्हा देशाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या हिंदू नेत्यांना वाटले, ‘मुस्लिमांसाठी वेगळी भूमी देऊ, त्यामुळे या प्रश्‍नातून सुटका होईल.’ त्यासाठी काकडी कापावी इतक्या सहजतेने मातृभूमीचे तुकडे पाडले गेले. त्यानंतरही लक्षावधी निष्पाप देशवासीयांची कत्तल रोखणे शक्य झाले नाही. लाखोंना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले. अगणित लोकांना निर्वासिताचे जगणे नशिबी आले. प्रश्‍न जसाच्या तसा राहिला. भारतीयांनी जिहादी मानसिकता कधीच समजून घेतली नाही. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांची अक्षम्य अवहेलना करण्यात आली. परिणामी, उर्वरित खंडित भारतातही जिहादी फुटिरता कायम राहिली. वाढत गेली. पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळसारख्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. काही ठिकाणी 2 टक्के तर काही ठिकाणी 18 ते 20 टक्क्यांनी फरक झाला आहे. आजही काही मुस्लिमबहुल ठिकाणी निर्वासित होण्याची वेळ हिंदू कुटुंबांवर येत आहे. आता जनतेत हळूहळू जागृती होत आहे. आव्हानाचे स्वरूप पाहता ती खूपच तोकडी आहे. या पार्श्‍वभूमीवर बीबीसीचे माजी पत्रकार, विचारवंत आणि ओपन सोर्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. तुफेल अहमद यांची लेखमाला विवेक विचारच्या वाचकांसाठी सुरू करत आहोत. या लेखांमधून लेखकाने या देशाला दीर्घकाळ छळणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येईल.

गेल्या 31 वर्षांत ‘विवेक विचार’ने मराठी जनांत वैचारिक जागरण करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. वाचकांचे प्रोत्साहन व आग्रह यामुळे चौमासिक असलेले हे नियतकालिक 2007 च्या विवेकानंद जयंतीपासून मासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. घटनाचक्र, सहज-संवाद, अशी माणसं...,हिंदुराष्ट्राची हृदयस्पंदने यांसारख्या सदरांच्या माध्यमांतून विवेक विचारने वाचकांशी स्नेहाचा बंध विणला. परिणामी वाचकच विवेक विचारचे प्रचारक बनल्याचा अनुभव आला. वाचकच आपल्या 8-10 परिचितांची वार्षिक वर्गणी गोळा करून पाठवतात, ही बाब आता नित्याचीच झाली आहे. वाचकांकडून मिळणारे हे प्रेमच आमच्या कार्याची ऊर्जा आहे. ‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे ब्रीद घेऊन कार्य करणार्‍या विवेकानंद केंद्राचा संदेश मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विवेक विचार करीत आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य विवेक विचारच्या माध्यमांतून सुरू आहे. स्वीमीजींचे विचार विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, गरीब-श्रीमंत,दलित, पीडित, शोषित, महिला, वैज्ञानिक, हिंदू, अहिंदू, आस्तिक, नास्तिक, प्रस्थापित, विद्रोही किंबहुना सर्वच स्तरांतील माणसाला आपलेसे करून त्याची उन्नती साधणारे आहेत. हे विचार विविध विषयांच्या परिप्रेक्षात वाचकांपर्यंत पोहोचवून वाचकाचे अनुभवविश्‍व समृद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजेच विवेक विचार. धर्म हा या राष्ट्राचा प्राण आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणत. आज अनेक शक्ती देशाच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी सरसावल्या आहेत. धर्मांतरण, जिहाद, आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे. अशावेळी ‘मला काय त्याचे?’ या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणार्‍या चळवळीचे नाव आहे विवेक विचार. या राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली, असे थोर विचारवंत आर्य चाणक्य म्हणतात. सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे विवेक विचार. विस्तार हेच जीवन अन् संकुचितता म्हणजे मृत्यू. बदलत्या काळाचे भान ठेवून वाचकाला बहुश्रुत बनविण्याची चळवळ आहे विवेक विचार. विवेक विचार हे वाचकाच्या मनावर संस्कार करणारे मासिक आहे. वाचन ही अशी साधना आहे की जी साधकाला तात्काळ वरदान देते !


Recent Issues

View All

Special Issues