Drushtilakshya Marathi- All Issues

कुटुंबात राहताना आई-वडील,मुले यांचा घडणाऱ्या घटनेकडे पाहायचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो.पण ज्या वेळेस दृष्टीलक्ष्य एक असेल,म्हणजेच विकास हे दृष्टीलक्ष्य असेल तर मात्र सर्वजण एकाच स्तरावर येऊन आनंदाने राहतील. क्रिकेट मध्ये सामना जिंकणे हे जर दृष्टीलक्ष्य असेल तर गोलंदाजाचा दृष्टीकोन असतो,मी जास्त विकेट्स घ्याव्यात. यष्टीरक्षकाला वाटत, की मी जास्त झेल घ्यावेत, तर फलंदाजाला वाटत,माझं शतक व्हाव. परंतु जेंव्हा सामना जिंकणे हे दृष्टीलक्ष्य असत,तेंव्हा आपोआपच कुणी शतक मारलं,कुणी झेल घेतले हे दृष्टीकोन मागे पडतात.कुणी झेल सोडले याविषयी वाद होत नाहीत, याउलट ज्याच्यामुळे सामना जिंकला जातोय त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात होते.'दृष्टीलक्ष्य' ला आपोआप महत्त्व मिळत. याच कुणाला अर्थाने 'दृष्टीलक्ष्य' मासिकाची निर्मिती होत आहे. आपल्या घरातील,आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे लक्ष्य वेगवेगळे असू शकेल. कुणाला व्यक्तिमत्त्व विकास आवश्यक वाटेल,कुणाला भावनिक, कुणाला बौद्धिक.एखाद्याला मुलांचा विकास भावेल तर कुणाला सर्वांचा अध्यात्मिक विकास व्हावा असे वाटेल या सर्वानच्या मागे दृष्टीलक्ष्य असेल, संपूर्ण कुटुंबाचा संपूर्ण विकास. त्यामुळे आपोआपच सर्वांचा चेतनेचा स्तर उंचावेल आणि उच्चतम विकसित समाजाची घडण होण्यास सुरुवात होईल. हा प्रयोग हातात घेताना आम्हा सर्वाना खात्री वाटते,की या प्रयोगात आपले सहकार्य व हातभार नक्कीच लागेल, प्रत्येक कुटुंबात दृष्टीलक्ष्य घेऊन जाऊ व सर्वांचा चेतनेचा स्तर उच्च करण्यास, संपूर्ण विकासास आपण निमित्त बनू. सरश्रींना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद!