यकृताचे आजार व आयुर्वेद

Yogya Aarogya|February 2020

यकृताचे आजार व आयुर्वेद
अरे तुला काय कावीळ झाली काय? तुला सगळ जगच पिवळे दिसतयं! हा वाक्यप्रयोग आपण ऐकला असेलच. तसेच नाकात औषध टाकण्याचा फुकटचा सल्ला लोक देताना आपण व्यव्हारात पाहिले असेलच. यकृताच्या आजारांबद्दल प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये कामल या नावाने आजाराचे वर्णन केले आहे.
विक्रम गायकवाड

कामला म्हणजे काय ? ज्या आजारात नख, डोळे, त्वचा, मुत्र आणि मल याचा रंग हळदीसारखा पिवळा होतो त्या आजारास कावीळ असे लोक बोली भाषेत म्हणतात. आयुर्वेदामध्ये या आजारास कामला असे म्हटले आहे. कामला या शब्दापासून कावीळ हा शब्द बोली भाषेत रूढ झाला आहे. कामला या शब्दाची फोड' काम' म्हणजे इच्छा विविध प्रकारची खाण्याची, पिण्याची, कोणतेही काम करण्याची इच्छा ज्या व्याधीत नष्ट होते. त्या व्याधीला ' कामला' असे म्हणतात. आधुनिक चिकित्सा प्रणाली नुसार डोळे, त्वचा व मुखातील श्लेष्मल त्वचा हा भाग होणे यासह रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण २ ते २. ५ पेक्षा जास्त झाल्यानंतर कावीळीची लक्षणे प्रत्यक्षात दिसू लागतात. प्रत्येक कावीळमध्ये पिवळेपणा येतोच असे नाही. काही वेळा जीवनसत्व ' अ' च्या अधिक प्रमाणामुळे त्वचेचा रंग पिवळा होतो. त्वचेचा रंग हा त्वचेवरची सूज व त्या भागाला होणारा रक्त पुरवठा या गोष्टीवर अवलंबून असतो. त्यामुळे पक्षाघात झालेला अर्धाभाग किंचित पिवळा भासू लागतो परंतु ही कावीळ नसते.

आयुर्वेदानुसार कावीळ हा रक्तवहस्त्रोतसाचा आजार आहे. रक्तधातू तयार होण्यापासून तो सर्व शरीरात अभिसरणाचे काम या स्त्रोतसामुळे होते. मूळ यकृत ( लिव्हर ) व प्लीहा ( स्प्लीन ) हे आहेत.

आयुर्वेद ग्रंथात काविळीचे मुख्यतः दोन प्रकारे वर्णन केलेले आहेत. १ ) बहुपित्तकामला २ ) रूध्दपथकामला असे दोन प्रकार पडतात. या प्रकारात आढळणारी लक्षणे पाहू.

१ ) बहुपित्तकामला : या प्रकारात नख, डोळे, त्वचा, मूत्र व मल यांचा पिवळा होतो. त्वचा निस्तेज होते, बेडकाच्या त्वचेप्रमाणे ती दिसते. यासह पोटात छातीत आग होते, अपचन, भूक न लागणे, दौबल्य, अंग गळून जाणे, तोंडाची चव जाणे, ताप येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

२ ) रूध्दपथकामला : हा काविळीचा दुसरा प्रकार होय. यात पित्ताचे प्रमाण वाढलेले नसते. नावाप्रमाणे पित्ताचा मार्ग आडवला गेलेला असतो. पित्तशयात झालेले खडे पित्तनळीत अडकतात व त्यामुळे पित्त तेथे साठून त्या भागात वेदना चालू होतात. ही या आजारातील गंभीर परीस्थिती आहे. यात पित्ताशयातील खडे लहान असल्यास ते मलासह बाहेर पडून जातात. या खड्यांचा आकार मोठा असल्यास व तो जर अडकला तर हा प्रकार होऊ शकतो किंवा इतर कारणामुळे म्हणजे गाठ किंवा कर्करोग या प्रकारात मार्ग आडवला जाऊन कावीळ होते.

काविळीची प्रमुख लक्षणे

काविळीची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे पहावयास मिळतात.

articleRead

You can read upto 3 premium stories before you subscribe to Magzter GOLD

Log-in, if you are already a subscriber

GoldLogo

Get unlimited access to thousands of curated premium stories and 5,000+ magazines

READ THE ENTIRE ISSUE

February 2020