يحاول ذهب - حر

Mehta Marathi Granthjaga - جميع الأعداد

पुस्तक निर्मितीप्रमाणेच ही सर्व पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यात पोहचावी म्हणून मेहतांनी अनेक नवनवीन योजना वेळोवेळी यशस्वीपणे राबवल्या आहेत. व ग्राहकांचा त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला आहे, मिळत आहे. वाचकांना आपल्या नवनवीन पुस्तकांचा परिचय व्हावा, व साहित्य क्षेत्रात घडणार्या घडामोडी एकत्रितपणे वाचायला मिळाव्यात यासाठी जानेवारी ९७ पासून मेहतांनी 'मेहता मराठी ग्रंथजगत' ही स्वत:ची गृहपत्रिका सुरु केली. हे वाङ्मयीन मासिक अल्पावधीतच वाचकप्रिय ठरले आहे. टी बुक क्लब व मेहता मराठी ग्रंथजगतच्या सभासदांना पुस्तक खरेदीवर खास सवलतही दिली जाते. अशा रितीने आम्ही आपला खास असा मोठा वाचक वर्ग निर्माण केला आहे. अनुवादित पुस्तकांसाठी राबवली जाणारी टी बुक क्लब योजना आज चांगलीच ग्राहकप्रिय झाली आहे. या योजनेचे ५0 रु. भरून सभासद होता येते. वर्षभरात एका क्लबमध्ये ६ अनुवादित पुस्तके प्रकाशित होतात. व सभासदांनी ही सर्व सहा पुस्तके निम्म्या किंमतीत मिळतात.